Tarun Bharat

रात्री दहा ते पहाटे सहा पर्यंत डॉल्बीवर बंदी

गणेश उत्सव साजरा करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश उत्सव मंडळांची बैठक बोलावली होती. यामध्ये रात्री दहा ते पहाटे सहा पर्यंत डॉल्बीवर बंदी घालण्यात आली. याबाबत सरकारने दहा मे रोजी आदेश पाठवला असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. तसेच या आदेशाचे पालन करावे अशी सूचना त्यांनी केली आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये पीओपी वर ही बंदी घालण्यात घालण्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र गणेशमूर्ती तयार झाल्या आहेत, त्यामुळे पुढील वर्षीपासून त्याबाबत निर्णय घ्यावा अशी विनंती मंडळांनी केली. यावेळी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, जिल्हा प्रशासनाने काढलेले पत्रक मराठीतही द्यावे, एक खिडकी योजना लवकरात लवकर सुरू करावी. तसेच लोंबकळणाऱ्या विद्युत व इतर केबल हटवाव्यात अशी मागणी मंडळांनी केली आहे. मिरवणूक रस्त्यावरील झाडाच्या फांद्याही वन विभागाने हटवाव्यात अशी सूचना बैठकीत करण्यात आली.

या बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील, पोलीस उपायुक्त रवींद्र गडाद, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुर्गुंडी, मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांच्यासह इतर अधिकारी तसेच मंडळाचे कार्यकर्ते सुनील जाधव, रमाकांत कोंडुसकर, हेमंत आवाळ, राजकुमार खटावकर, नितीन जाधव यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

कर्नाटकात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृतांच्या संख्येत वाढ

Archana Banage

”मोदी सरकारने पेगॅसस विकत घेतलं की नाही ?” राहुल गांधींचा सवाल

Archana Banage

मोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची रालोआतून बाहेर पडण्याची घोषणा

Archana Banage

बाळासाहेब थोरातांनी घेतली शरद पवारांची भेट

Archana Banage

द्वितीय पीयूसी परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘दीक्षा अॅप’ची होणार मदत

Archana Banage

मिरजेत ऍसिड गोडाऊनमध्ये स्फोट

Archana Banage