वृत्तसंस्था/ अस्ताना (कजाकस्तान)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या आंततराष्ट्रीय अस्ताना खुल्या टेनिस स्पर्धेत शनिवारी सर्बियाच्या माजी टॉप सिडेड जोकोविचने एकेरीची अंतिम फेरी गाठली.
या स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना जोकोविच आणि रशियाचा डॅनिल मेदव्हेदव यांच्यात खेळविला गेला. दरम्यान दुसऱया टायब्रेकर सेटमध्ये मेदव्हेदवच्या पायाला दुखापत झाल्याने त्याने या स्पर्धेतून माघार घेतली. हा सामना 4-6, 7-6 (6-6) अशा स्थितीत असताना मेदव्हेदवने ही लढत अर्धवट सोडली. आता जोकोविच आणि ग्रीसचा सित्सिपस यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. सिटसिपेसने उपांत्य फेरीच्या लढतीत रशियाच्या रुबलेव्हचा 4-6, 6-4, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. सर्बियाच्या जोकोविचने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत एटीपी टूरवरील स्पर्धांमध्ये आतापर्यंत 89 अजिंक्यपदे मिळविली आहेत.