वृत्तसंस्था/ ऍस्टाना (कझाकस्तान)
एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या तिसऱया अस्ताना खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीत सर्बियाचा माजी टॉप सीडेड टेनिसपटू नोव्हॅक जेकोविचने एकेरीचे अजिंक्मयपद पटकाविताना ग्रीसच्या स्टीफॅनोस सित्सिपसचा पराभव केला.
रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात 35 वषीय जोकोविचने चौथ्या मानांकित सित्सिपसचा 75 मिनिटांच्या कालावधीत 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. जोकोविचचा हा सित्सिपसवरील सलग नववा विजय आहे. सोमवारी घोषित झालेल्या एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत 24 वषीय सित्सिपसने पहिल्या पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. 2022 च्या टेनिस हंगामातील विविध स्पर्धांमध्ये सित्सिपसने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. जोकोविचने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत आतापर्यंत 21 ग्रॅण्डस्लॅम अजिंक्मयपदे मिळविली आहेत.