Tarun Bharat

सिनसिनॅटी स्पर्धेतून जोकोविचची माघार

Advertisements

वृत्तसंस्था / सिनसिनॅटी

एटीपी टूरवरील सिनसिनॅटी पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून सर्बियाचा 35 वषीय जोकोविचने माघार घेतली. कोरोना संदर्भातील लस अमेरिकेत सक्तीची करण्यात आली असून जोकोविचने अद्याप ही लस घेतली नसल्याने त्याला अमेरिकेत प्रवेश दिला जाणार नाही.

सिनसिनॅटी टेनिस स्पर्धा हार्डकोर्टवर पुढील आठवडय़ात खेळविली जाणार आहे. 29 ऑगस्टपासून न्यूयॉर्कमध्ये होणाऱया अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वीची ही शेवटची सरावाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते.

गेल्यावषी जोकोविचला अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत प्रवेश देण्यात आला नव्हता. जोकोविचने आतापर्यंत 21 ग्रँडस्लॅम अजिंक्मयपदे मिळविली असून स्पेनच्या राफेल नदालने 22 ग्रँडस्लॅम जेतेपदासह विक्रम नोंदविला आहे. कॅनडा आणि अमेरिकेत कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या व्यक्तीलाच प्रवेश दिला जात असून लस न घेतलेल्या विदेशी व्यक्तीवर बंदी घालण्यात आली आहे. जोकोविचने आतापर्यंत तीनवेळा अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. सिनसिनॅटी टेनिस स्पर्धेतून जोकोविचपूर्वी जर्मनीच्या विद्यमान विजेत्या व्हेरेवने देखील माघार घेतली आहे.

Related Stories

चौरंगी जिम्नॅस्टिक स्पर्धा टोकियोत

Omkar B

बेअरस्टोचे शतक!

Patil_p

भारत-डेन्मार्क डेव्हिस लढत 4 मार्चपासून

Patil_p

रशियाच्या पुतिनसेव्हाचे दुसरे जेतेपद

Patil_p

अवघ्या 6 सें टीमीटर्सने हुकला 90 मीटर्सचा मार्क!

Patil_p

भारत अ च्या विजयामध्ये, शॉचे अर्धशतक, कुलदीपची हॅट्ट्रीक

Patil_p
error: Content is protected !!