प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी आढळलेल्या तन्वी घाणेकर हिच्या मृतदेहाची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांकडून घेण्यात आला आह़े तन्वी बेपत्ता झाल्यापासून 6 दिवसानंतर खोल दरीत तिचा मृतदेह आढळला होत़ा यावेळी मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने कपडय़ांच्या आधारे ओळख पटविण्यात आली. मात्र तो मृतदेह तन्वीचाच असल्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आह़े
तन्वीच्या आत्महत्येबाबत पोलिसांकडून आता कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात येत आहेत़ 3 ऑक्टोबर रोजी तन्वीचा मृतदेह आढळून आला तेव्हा घटनास्थळी तिचे नातेवाईक उपस्थित होत़े तो मृतदेह तन्वीचाच असल्याचे नातेवाईकांनी खात्रीपूर्वक सांगितले होत़े मात्र मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. परंतु भविष्यात कोणताही प्रश्न उपस्थित करण्यात येऊ नये यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आह़े
शहरातील खालचा फगरवठार येथील तन्वी रितेश घाणेकर (33) 29 सप्टेंबर पासून बेपत्ता होत़ी यासंदर्भात तिचा पती रितेशने रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दिली होत़ी पोलिसांना तन्वीची दुचाकी (एमएच 08 एक्स 7116) भगवती बंदर येथे आढळून आल़ी 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी तिचा मृतदेह रत्नदुर्ग किल्ल्यावरील कपल पॉईंट येथील 200 फूट दरीत आढळून आल़ा पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये तिने आत्महत्या केल्याचे समोर आल़े शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात घातपात नसल्याचे नमूद करण्यात आल्याने पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आह़े पोलिसांकडून विविध पातळीवर तपास करण्यात येत आह़े तन्वीला कुणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले का, तिच्यावर कोणता दबाव होता का याबाबत कसून तपास सुरूच आह़े
पोलिसांच्या तपासात काही महत्वाचे धागेदोरे आढळून आल्यास पुढील कारवाई हाती घेतली जाणार असल्याचे समजते. यामध्ये नातेवाईकांची भूमिका महत्वाची ठरणार आह़े दरम्यान पोलिसांकडून तन्वी काम करत असलेल्या मिरजोळे एमआयडीसी येथील कंपनीत सुरु असलेल्या चौकशीत काही नवीन माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आह़े
महिन्याभरात येणार डीएनए अहवाल
जिल्हा शासकीय रूग्णालयात तन्वीचे शवविच्छेदन करण्यात आले होत़े यावेळी डीएनए तपासणीसाठी नमुने राखून ठेवण्यात आल़े हेच नमुने डीएनए चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ डीएनए जुळविण्यासाठी तन्वीच्या नात्यामधील एकाचे नमुने घेण्यात आले आहेत़ डीएनए तपासणीचा अहवाल साधारणतः एक महिन्यात प्राप्त होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आह़े