Tarun Bharat

बेकिनकेरेत उद्यापासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

प्रतिनिधी / बेळगाव : बेकिनकेरे येथे रविवार दि. 2 ते शुक्रवार दि. 7 ऑक्टोबरपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळय़ात दररोज सकाळी काकडारती, घटपूजन, होमपूजन, तुळसपूजन, ध्वजवंदन, महिला भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन-निरूपन आणि जागर भजन होणार आहे.
रविवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते पूजन होवून या हरिनाम सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. या दिवशी दुपारी होसूर येथील माfहला भजनी मंडळाचे भजन, अतिवाड येथील महिला हरिपाठ तर 7 ते 8 यावेळेत हभप प्रभाकर सावंत यांचे प्रवचन, रात्री 9 ते 11 यावेळेत मंडोळी येथील हभप मारुती पाटील यांचे कीर्तन होवून रात्री जागर भजन होणार आहे.

सोमवार दि. 3 रोजी सायंकाळी देवर्डे येथील हभप महेश भादवणकर यांचे प्रवचन आणि कीर्तन होणार आहे. तर रात्री माfहला भजनी मंडळाचे जागर भजन होणार आहे. मंगळवार दि. 4 रोजी सोनोली येथील हभप परशराम कनगुटकर यांचे प्रवचन तर कल्लेहोळ येथील हभप निवृत्ती मुचंडीकर यांचे कीर्तन होणार आहे. रात्री महिला भजनी मंडळाचा जागर भजन होणार आहे. बुधवार दि. 5 रोजी हभप विश्वनाथ भवन यांचे प्रवचन तर निलजी येथील हभप गजानन पाटील यांचे कीर्तन होणार आहे. रात्री महिला भजनी मंडळाचे जागर भजन होणार आहे. गुरुवार दि. 6 रोजी हभप बळवंत हुंदरे यांचे प्रवचन तर हभप बाळू भक्तीकर यांचे कीर्तन होणार आहे. रात्री महिला भजनी मंडळाचा जागर भजन होणार आहे. शुक्रवार दि. 7 रोजी सकाळी 8 ते 10 यावेळेत हभप शिवाजी बसरीकट्टी यांचे काला कीर्तन होवून प्रसादाचे वितरण केले जाणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

पिरनवाडी नाल्याजवळ पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत

Patil_p

जीवनात शिक्षणाचे महत्त्व अतिश्रेष्ठ

Patil_p

खानापूर तालुक्यात शनिवारी १० नव्या कोरोना बाधितांची नोंद

Tousif Mujawar

खानापूर केएसआरपी रस्त्यावरील पुलाला भगदाड

Amit Kulkarni

पशुवैद्यकीय अधिकारी शेतकऱयाच्या बांधावर

Amit Kulkarni

आयुषी, मोनिष विजेते, यशस्विनी घोरपडेला दुहेरी मुकूट

Amit Kulkarni