Tarun Bharat

अंबे मेटालिकच्या विस्ताराला मान्यता देऊ नका

होंडा पंचायतीच्या खास ग्रामसभेत जोरदार विरोध : नागरिकांच्या आरोग्यासह जैवविविधतेला धोका

प्रतिनिधी / वाळपई

पिसुर्ले औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या अंबे मेटालिक कंपनीच्या विस्ताराला परवानगी दिल्यास आसपासच्या गावांमधील नागरिकांचे आरोग्य, शेती, बागायती,  पर्यावरण, जैवविविधता धोक्मयात येणार आहे  सध्याच्या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पाच्या विस्ताराला परवानगी देऊ नये, अशी जोरदार मागणी होंडा पंचायतीच्या खास ग्रामसभेतून करण्यात आली.

अंबे मेटालिक प्रकल्पाच्या विस्ताराला पर्यावरण दाखला देण्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी या प्रकल्पाच्या विस्ताराला जोरदार विरोध दर्शविला होता. त्यानंतर यासाठी सात दिवसांत खास ग्रामसभा घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर होंडा पंचायत अंतर्गत सरपंच शिवदास माडकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. यावेळी सर्व पंच निलिमा शेट्यो, प्रमोद गावडे, दीपक गावकर, सुशांत राणे, सुमेधा मांडकर, नीलेश सातार्डेकर, स्मिता माटे, सिया बाडके, रेश्मा गावकर, आदीसह पर्यावरणप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 सरपंच शिवदास माडकर यांनी सुऊवातीला खास ग्रामसभेचा उद्देश स्पष्ट केला.

यावेळी त्यांनी अंबे मेटालिक कंपनीच्या प्रदूषणामुळे निर्माण होत असलेल्या समस्यांबाबत बाजू मांडली. या प्रकल्पाचा विस्तार झाल्यास होंडा भागामध्ये कोळसा हब निर्माण होणार आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या तीव्र होणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पाच्या विस्ताराला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रकल्पाच्या विस्ताराबाततची भूमिका स्थानिक आमदार डॉ. देविया राणे यांनी  जाहीर करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भीमराव राणे यांनी केली. शेती बागायती नष्ट होणार आहेत. तसेच या प्रकल्पासाठी पाण्याची व्यवस्था कुठून करणार असा सवाल यावेळी त्यांनी केला.

सामाजिक कार्यकर्ते बी. डी. मोटे, नासीर शेख, झिला गावकर यांनी स्थानिक आमदारांनी गांभीर लक्ष घालण्याची मागणी करून प्रकल्पाला कोणत्याही स्थितीत मान्यता देऊ नये, अशी मागणी केली. पंचायतीचे सचिव मुला वरक यांनी ग्रामसभेचा अहवाल सरकारला सादर करणार असल्याचे यावेळी सांगितले. दीपक गावकर यांनी आभार मानले.

Related Stories

वेरेत सर्वधर्मियांना शवपेटिका

Amit Kulkarni

हवाई प्रवाशांसाठी आता दाबोळी विमानतळावर आरोग्यदायी काढा उपलब्ध

Omkar B

मळ्यातील ‘केबल स्टेड’चे 30 रोजी उद्घाटन

Patil_p

किनारी भागातील पोलीस अधिकाऱयांच्या बदलीसाठी हालचाली

Amit Kulkarni

डिचोली तालुक्मयाला पावसाने झोडपले

Omkar B

राज्य महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

Patil_p