Tarun Bharat

राज्यात सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटायला नको

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

दहाव्या सुचीनुसार 16 बंडखोर आमदार अपात्र ठरणार आहेत. कारण संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

आज सकाळी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, संविधानाची सीमा ओलांडून न्यायमूर्ती निर्णय देणार नाहीत, असा विश्वास वाटतो. त्यामुळे 16 आमदार अपात्र ठरतील अथवा फुटीर गटाला इतर पक्षात सामिल व्हावे लागेल. दुसऱ्या पक्षात विलीन होण्याबाबत अनेक आमदारांची तयारी नाही. त्यामुळे काही आमदार पुन्हा आमच्याकडे येतील. काही जण आमच्या संपर्कातही आहेत.

10 व्या सुचीनुसार 16 आमदार अपात्र ठरतील. त्यामुळे जर उद्या सत्ता परिवर्तन झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंवर बोलताना ते म्हणाले, शिंदे शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणवून घेत असतील तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला दिल्लीत कधी जावे लागले नाही. शिवसेनेचे हायकमांड हे मुंबईत आहेत, त्यामुळे सगळय़ा चर्चा या मुंबईतच होत होत्या. पण, आता आमच्या मुख्यमंत्र्यांना महिन्यातून पाचवेळा दिल्लीला जावे लागत आहे. बहुतेक ते आपला मुक्काम दिल्लीत हलवतात की काय, असा प्रश्न आता राज्यातील जनतेला पडला, आहे, असा खोचक टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.

हेही वाचा : अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरातही कोट्यवधींचं घबाड; 29 कोटींची रोकड, 5 किलो सोने जप्त

Related Stories

लडाख : स्कार्दू हवाई तळावर पाकची लढाऊ विमाने तैनात

datta jadhav

पाव ग्रॅम ड्रग पकडून अधिकाऱ्यांनी जागतिक किर्ती-ख्याती प्राप्त केली; संजय राऊतांचा NCB वर निशाणा

Abhijeet Khandekar

अपर्णा यादव भाजपात दाखल

datta jadhav

शेतकऱ्य़ांच्या प्रश्नावर विधिमंडळाच्या पायऱ्यावर पुन्हा ‘मविआ’चं आंदोलन,हातात पोस्टर घेऊन घोषणाबाजी

Abhijeet Khandekar

दहावी परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देवू नये

Abhijeet Khandekar

कसबा बावड्यात युवकावर पूर्ववैमस्यातून खुनी हल्ला

Archana Banage