तरुण भारत

कोलकाता नाईट रायडर्स-हैदराबादसाठी करो वा मरो

हैदराबादसमोर गोलंदाजीत चिंता, केकेआरला सातत्य रोखण्याची गरज

पुणे / प्रतिनिधी

Advertisements

आयपीएलच्या या सीझनमधील प्लेऑफचे आव्हान कसेबसे जिवंत ठेवणाऱया कोलकाता नाईट रायडर्स आणि मागील सलग चार मॅच हरणाऱया सनरायजर्स हैदराबाद यांच्यात शनिवारी सामना होणार आहे. दोन्ही संघांना विजय अनिवार्य आहे. सनरायजर्स हैदराबाद सलग 4 पराभवांसह बराच झगडत आला असून त्यांना गोलंदाजीत बऱयाच चिंता सतावत आहेत. दुसरीकडे, केकेआरला सातत्य नसल्याचा फटका बसत आला आहे.

 गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सायंकाळी साडेसातपासून आजचा सामना रंगणार आहे. शुक्रवारच्या सामन्यापूर्वी, हैदराबाद दहा गुणांसह रनरेटच्या आधारे सहाव्या क्रमांकावर तर, कोलकाता दहा गुणांसह सातव्या क्रमांकावर होते. कोलकात्याने मुंबईला मागील सामन्यात पराभूत केले आहे तर, हैदराबाद सलग चार सामन्यात पराभूत झाला आहे.

 कोलकात्याच्या सलामीचा प्रश्न कायम आहे. सलामीची जोडी सारखी बदलण्यात येत आहे. त्यामुळे कोणालाच स्थिरस्थावर होता आलेले नाही. बाबा इंद्रजित-ऍरॉन फिंच, रहाणे-वेंकटेश अय्यर अशा विविध पर्यायांचा वापर झाला आहे. सलामीवीर म्हणून फिंच, बाबा इंद्रजित यांना फारशी चमक दाखवता आली नाही. रहाणे-वेंकटेश अय्यर यांना मागच्या सामन्यात सुरुवात मिळाली होती. पण, त्याचा फायदा ते घेऊ शकले नाहीत. यानंतर श्रेयस अय्यरला धावा कराव्या लागतील. तर नितीश राणा, रिंकू सिंग यांना मधली फळी सांभाळावी लागेल.

रसेलचा फॉर्म हा कोलकात्यासाठी डेकेदुखी ठरत आहे. त्याच्या धावांचा ओघ आटल्याने कोलकात्याला अडचण निर्माण होत आहे. नरेनला गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही लक्षवेधी योगदान द्यावे लागेल. टीम साऊदी, उमेश यादव, शिवम मावी यांच्यावर गोलंदाजीचा भार असणार आहे. सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती यांच्यावर फिरकीची मदार असणार आहे.

  केन विल्यम्सन आणि अभिषेक शर्मा या सलामीवीरांना आक्रमक रणनीतीवर भर द्यावा लागेल. यानंतर राहुल त्रिपाठीला आपल्या धावांचा ओघ कायम ठेवावा लागेल. मधल्या फळीत ईडन मॅरक्रम, निकोलस पूरन, प्रियम गर्ग यांच्यावर फलंदाजी अवलंबून असणार आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये हैदराबाद हरण्याचे मुख्य कारण म्हणजे वॉशिंग्टन सुंदर आणि टी. नटराजन या आघाडीच्या गोलंदाजांना झालेल्या दुखापती. तसेच वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा अचानक फॉर्म जाणे, हे हैदराबादच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही. त्यामुळे सर्व भार भुवनेश्वर कुमारवर येत आहे. त्यामुळे हैदराबादला गोलंदाजीत सुधारणा करणे गरजेचे आहे.

संभाव्य संघ

केकेआर ः श्रेयस अय्यर (कर्णधार),  ऍरॉन फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंग, रिंकू सिंग, अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिका दार, शिवम मावी, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकूल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्ज, शेल्डॉन जॅक्सन.

सनरायजर्स हैदराबाद ः केन विल्यम्सन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मॅरक्रम, निकोलस पूरन, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णू विनोद, ग्लेन फिलीप्स, आर. समर्थ, शशांक सिंग, रोमारिओ शेफर्ड, मार्को जान्सन, जे. सुचित, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन ऍबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फझलहक फारुकी, उमरान मलिक, टी. नटराजन.

सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.

 पॅट कमिन्स)

जलद गोलंदाज पॅट कमिन्स उर्वरित आयपीएलमधून बाहेर, कोलकाताला धक्का

 आयपीएलच्या या सीझनमध्ये मुंबईचा पराभव करून कोलकात्याने आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. मात्र, पॅट कमिन्सने आयपीएलमधून दुखापतीमुळे माघार घेतल्याने कोलकात्याला मोठा धक्का बसला आहे. कमिन्स मायदेशी परतला असून त्याची गैरहजेरी भरुन काढण्याचे आव्हान केकेआरसमोर आता उभे ठाकले आहे.

ऑस्ट्रेलियन कसोटी नेतृत्व भूषवत असलेल्या पॅट कमिन्सला केकेआरने 7.25 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील महिन्यात श्रीलंका दौऱयावर जाणार असून त्यापूर्वी कमिन्स तंदुरुस्त होण्याची क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अपेक्षा आहे.

गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध 4 षटकात 22 धावात 3 बळी घेणाऱया पॅट कमिन्सला लढतीदरम्यान दुखापत झाली आणि तो उर्वरित हंगामात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाबरोबरच वनडे व टी-20 साठीही महत्त्वाचा सदस्य आहे. ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंका दौऱयानंतर मायभूमीतील टी-20 विश्वचषकात जेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्यानंतर 5 कसोटी सामन्यांची मालिका, भारताचा कसोटी दौरा व ऍशेस मोहिमेत ते खेळतील. कमिन्सने यंदा आयपीएल हंगामात केवळ 5 सामने खेळले असून त्याला 17.0 च्या स्ट्राईक रेटने 7 बळी घेता आले. याशिवाय, फलंदाजीत 63 धावा फटकावल्या. यामध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध अवघ्या 14 चेंडूत झोडपलेल्या नाबाद 56 धावांच्या खेळीचा आवर्जून समावेश राहिला आहे.

Related Stories

सुरक्षितता असेल तरच राष्ट्रीय क्रिकेट शक्य : गांगुली

Patil_p

टी.नटराजनच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया

Patil_p

‘फिनिशर’ धोनीमुळे मुंबई ‘फिनिश’!

Amit Kulkarni

ओसाका, बार्टी, स्विटोलिना, बेन्सिक दुसऱया फेरीत

Patil_p

अश्विनला आयपीएलमध्ये ‘मंकडिग’ची परवानगी देणार नाही

Patil_p

अमेरिकन ओपन स्पर्धा आजपासून

Patil_p
error: Content is protected !!