दिवाळी हा सर्वात मोठा आणि आनंदाचा सण आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण दिवाळीची वाट पाहत असतात. या सणाला प्रत्येकालाच नवीन कपडे घालून नटायला आवडत. मग त्यात महिला वर्ग ही मागे नसतो.पण घरातील पूजेच्या तयारीमुळे आणि कामांमुळे अनेकांना मेक-अपसाठी वेळ मिळत नाही. आणि पार्लरलाही जात येत नाही. अशा वेळी घरीच झटपट मेक-अप करायचा असेल तर आम्ही काही टिप्स सांगणार आहोत.
दिवाळीला मेक-अप करण्याआधी सर्वप्रथम चेहरा फेस वॉशने धुवा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जमा झालेली धुळ निघून जाईल. त्यानंतर स्वच्छ टॉव्हेलने चेहरा पुसून घ्या.
चेहऱ्यावर क्रिम किंवा लोशन न लावता कधीही मेक-अप करू नये. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर चेहऱ्यावर कोरफडचे जेल लावा. तसेच तुमच्या चेहऱ्याला सूट होणारी क्रिम लावा.
चेहऱ्यावर क्रिम लावल्यानंतर फाउंडेशन लावावे. तुम्ही स्टिक फाउंडेशनचा वापर करू शकता. त्यानंतर स्पंजला पाण्यामध्ये बुडवून तो स्पंज भिजवून घ्या. ओल्या स्पंजने चेहऱ्यावर फाउंडेशन लावावे.यामुळे तुमच्या चेहऱ्यावर असलेले डाग झाकता येतात.
फाउंडेशन लावून झाल्यानंतर आयलायनर लावावे. दिवाळीमधील फेस्टिव्हल लूकसाठी डार्क आय मेक-अप चांगला दिसतो.यामुळे चेहरा देखील आकर्षक दिसतो. आयलायनर लावल्यानंतर तुम्ही मस्करा देखील लावू शकता.
थोडेसे आयशॅडो लावून देखील तुम्ही फेस्टिव्हल सिझनचा लूक सुंदर करू शकतात. जर तुमच्याकडे आयशॉडो नसेल तर तुम्ही लिप्स्टिकचा वापर आयशॅडो म्ह्णून करू शकता.
मेकअप झाल्यांनतर सर्वात शेवटी लिप्सस्टिक लावावी. मॅट किंवा लिक्विड लिपस्टिकचा वापर तुम्ही करू शकता.
अशा प्रकारे गडबडीच्या साधा पण सुंदर लुक तुम्ही घरच्या घरी करू शकता.

