Tarun Bharat

नित्यनेमाने योग करा : कवळेकर

वार्ताहर /केपे

आपल्या दैनंदिन जीवनात आपण कितीही व्यस्त असलो, तरी आपल्या चांगल्या आरोग्याकरिता व तंदुरुस्तीकरिता थोडा तरी वेळ काढून नित्यनेमाने योग करावा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी केले. ते केपे भाजप मंडळातर्फे केपे पालिका सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी केपेच्या नगराध्यक्ष सुचिता शिरवईकर, नगरसेवक दयेश नाईक, प्रसाद फळदेसाई, जि. पं. सदस्या संजना वेळीप, सरपंच जेन्सिता डायस, मंडळाचे अध्यक्ष संजय वेळीप, प्रभाकर गावकर, विराज देसाई व अन्य पदाधिकारी तसेच इतर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर संपूर्ण देशात योगदिन साजरा करण्यात येऊ लागला. देशाबरोबरच संपूर्ण जगात आता योगदिन साजरा केला जात असून ही देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे कवळेकर यांनी सांगितले.

Related Stories

अपयश लपविण्यासाठीच आरोप

Patil_p

अठरा अधिकाऱ्यांच्या बदल्या

Amit Kulkarni

राज्यपाल मलिक यांची बदली योग्य जागी

Omkar B

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची डिचोलीला भेट

Omkar B

गोवा वेल्हात 6 लाखाचे बेकायदेशीर मद्य जप्त

Amit Kulkarni

मतदान करुन परतताना वड कोसळल्याने पत्नी ठार

Amit Kulkarni