काहेर विद्यापीठातर्फे डॉ. प्रभाकर कोरे-आशा कोरे यांचा सत्कार
प्रतिनिधी /बेळगाव
केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांना थॉमस जेफर्सन विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी दिली आहे. याबद्दल काहेर विद्यापीठातर्फे डॉ. प्रभाकर कोरे व आशा कोरे यांचा सत्कार करण्यात आला. अशी डॉक्टरेट मिळविणारे डॉ. प्रभाकर कोरे हे पहिले भारतीय आहेत.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले यांनी डॉ. कोरे यांच्या कार्याचा गौरव केला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी कोरे यांचे अभिनंदन करून शिक्षण क्षेत्रात त्यांनी वेगळा ठसा उमटविल्याचे स्पष्ट केले.
काहेरचे माजी संचालक व संशोधक डॉ. बी. एस. कोडकिणी यांनी जेएनएमसीने शिकागो येथील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनीऑसबरोबर केलेला वैद्यकीय क्षेत्रातील पहिला करार कसा होता? याची माहिती दिली. डॉ. एच. बी. राजशेखर, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. एस. एस. गौडर, महांतेश कौजलगी यांची कोरे यांचे अभिनंदन करणारी भाषणे झाली.