Tarun Bharat

बाणावली आरोग्य केंद्रात डॉक्टरांची 24 तास उपलब्धता हवी : वेंझी व्हिएगस

प्रतिनिधी /मडगाव

आम आदमी पार्टी बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी करमणे आणि बाणावली येथील आरोग्य उपआरोग्य केंद्रांवर डॉक्टरांची चोवीस तास उपलब्धता करण्याची मागणी केली आहे.

आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. गीता काकोडकर आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या स्पेशल डय़ुटीसाठी नेमण्यात आलेले अधिकारी डॉ. राजनंदा देसाई यांनी आमदार वेंझी व्हिएगस यांच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.

मतदारसंघातील आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत चर्चा करण्यासाठी दोन्ही अधिकाऱयांनी आमदार वेंझी व्हिएगस यांच्या कार्यालयाला भेट दिली होती. याशिवाय दोन्ही अधिकारी, आमदार तसेच वैद्यकीय पथक करमणे येथील मोंडो बाणावली उपआरोग्य केंद्र आणि आरएमडी/आरोग्य कल्याण उपकेंद्रालाही भेट दिली.

बाणावली मतदारसंघात आरोग्य व्यवस्था सुधारणाबाबत व्हिएगस यांनी अनेक संकल्पना अधिकाऱयांसमोर मांडल्या. आरोग्य संचालकांनी करमणे उपआरोग्य केंद्राची पाहणी केली आणि तेथील कर्मचाऱयांशी संवाद साधला. उपकेंद्र व्यवस्थित असल्याचे पाहून आरोग्य संचालकांनी समाधान व्यक्त केले.

व्हिएगस म्हणाले, उपआरोग्य केंद्र विकसित करण्यासाठी बरेच काम करावे लागेल आणि आरोग्य मंत्री, आरोग्य संचालक आणि वैद्यकीय पथक यांच्यासोबत काम करणे अत्यंत फायदेशीर ठरेल’ काकोडकर आणि देसाई यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान व्हिएगस यांनी उपचाराचा दर्जा सुधारण्यासाठी सूचना केल्या.

Related Stories

भाजपला पराभव, गोव्याचे रक्षण हेच ध्येय

Amit Kulkarni

आजपासून मासेमारी बंदी

Omkar B

समविचारी पक्षांशी युतीचा विचार

Amit Kulkarni

माशेलातील चिखलकाला उत्साहात

Amit Kulkarni

जनावरांची कत्तल करणारे चारजण ताब्यात

Omkar B

मुलांचे अपहरण अफवांना बळी पडू नका

Amit Kulkarni