भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि आघाडीचा फंलंदाज ऋषभ पंत याचा भीषण अफघात झाला. 25 वर्षीय ऋषभ उत्तराखंडमधील आपल्या घरी जात असताना पहाटे साडेपाच वाजता रुरकेजवळ महामार्गावर त्यांची कार दुभाजकाला धडकली आणि काराल आग लागली. अपघातात त्याच्या डोक्याला, गुडघ्याला, आणि पाठीला दुखापत झाली आहे. स्थानिक लोकांनी काही वेळातच डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरू केले. ऋषभ ची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
उत्तराखंड पोलीसांनी दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, ऋषभ पंत हा एकटाच प्रवास करत होता. तो गाडी चालवत असताना झोपी त्याला डुलकी आली. यामुळे त्याचा कारवरील ताबा सुटला आणि रुरकीजवळील मोहम्मदपूर जाट येथील महामार्गावरील रोड डिव्हायडरला मर्सिडीज कारने जाऊन धडकली. या धडकेनंतर कारने पेट घेतला. त्यानंतर ऋषभने यातून बाहेर पडण्यासाठी विंडस्क्रीन तोडले. त्यानंतर तो दुभाजकांच्या दरम्यान पडला होता. स्थानिक लोकांनी लगेच रुग्णवाहिका बोलवून आली. त्यानंतर त्याला रुरकी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात ऋषभच्या डोक्याला आणि पाठीला जबर मार लागला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ आशिष याज्ञिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “ऋषभ पंत यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. त्याची प्रकृती स्थिर आणि ठिक असून डॉक्टरांची एक टीम त्याच्यावर उपचार करत आहे. काही टेस्टनंतरच अधिक काही सांगता येईल. पण सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि काळजी करण्याची फारशी गरज नाही.” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी प्रशासनाला पंतच्या उपचारासाठी शक्य त्या सर्व व्यवस्था सुनिश्चित करण्यास सांगितले. ऋषभ लवकरात लवकर बरा व्हावा. अशी प्रार्थना करत मुख्यमंत्र्यांनी उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचे जाहीर सांगितले. गरज भासल्यास एअर अॅम्ब्युलन्सही दिली जाईल, असे राज्य सरकारच्या निवेदनात म्हटले आहे.