नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
एक जुलैला देशभरामध्ये नॅशनल डॉक्टर्स डे साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील डॉक्टर्सना संबोधित केले. कोरोना काळात आपल्या डॉक्टर्सनी ज्याप्रकारे देशाची सेवा केली, ही एक प्रेरणा आहे. तसेच सर्व भारतीय डॉक्टरांचे आभार व्यक्त करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स देवाचे दुसरे रुप असल्याचे म्हटले आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा देश कोरोना विरोधात लढाई लढत होतो, तेव्हा डॉक्टरांनी लाखो लोकांचे प्राण वाचवले. अनेक डॉक्टरांना आपल्या अथक प्रयत्नात आपले बलिदान दिले. आमच्या सरकारने आरोग्य सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान आम्ही आपल्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे वाटप केले होते. यावर्षी आरोग्य सेवेसाठी २ लाख कोटींपेक्षा जास्त रुपयांचे वाटप झाले आहे.
पूर्वीच्या काळात वैद्यकीय पायाभूत सुविधांकडे कशाप्रकारे दुर्लक्ष केले गेले होते, त्याची आपल्याला जाणीव आहे. पण आमच्या सरकारचे लक्ष वैद्यकीय पायाभूत सुविधांवर आहे. वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ५० हजार कोटी रुपयांची एक क्रेडिट गारंटी स्कीम घेऊन येणार आहोत. जिथे आरोग्य सुविधा कमी आहे. आमचे सरकार आमच्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी वचनबद्ध असल्याचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
एक जुलैला देशभरामध्ये नॅशनल डॉक्टर्स डे साजरा करण्यात येतो. याच दिवशी देशाचे महान डॉक्टर तसेच पश्चिम बंगालचे दूसरे मुख्यमंत्री डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यांच्या स्मरणार्थ,आदरार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो.