काकतीवेस येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिका जखमी : मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास रास्ता रोको करण्याचा नागरिकांचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात एक पाच वषीय बालिका जबर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काकतीवेस, शनिवारखूट परिसरात मागील काही दिवसात भटक्मया कुत्र्यांनी हैदोस मांडला आहे. ये-जा करणाऱया नागरिकांचा चावा घेण्याचा प्रयत्न या कुत्र्यांकडून सुरू आहे. रविवारी सकाळी एका पाच वषीय बालिकेवर कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली असून भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास काकतीवेस रोडवर रास्तारोको करू, असा इशारा स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेला दिला आहे.
शहरातील भटक्मया कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहराच्या कोणत्या ना कोणत्या भागात भटक्मया कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे जखमी झालेल्यांची संख्या वाढत आहे. शनिवारखुट ते सरदार्स हायस्कूलपर्यंत अनेक चिकन, मटणची दुकाने, बेकरी, हॉटेल्स व इतर दुकाने आहेत. यातील शिल्लक पदार्थ खाण्यासाठी परिसरातील भटकी कुत्री काकतीवेस रोडवर जमा होत आहेत. सकाळी व रात्रीच्या वेळी भटक्मया कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. मॉर्निंग वॉकला जाणाऱया नागरिकांना तर हमखास कुत्र्यांचा सामना करावा लागत आहे.
रविवारी सकाळी एक पाच वर्षीय बालिका दूध आणण्यासाठी काकतीवेस येथील दुकानात गेली होती. यावेळी भटक्मया कुत्र्यांनी तिच्यावर झडप घालून चावा घेतला. यामध्ये ती जखमी झाली असून, तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नार्वेकर गल्ली, रिसालदार गल्ली, गणाचारी गल्ली, चांदू गल्ली, खडक गल्ली कॉर्नर, भडकल गल्ली कॉर्नर येथे कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे.
ठोस उपाययोजना राबवा
चार दिवसांपूर्वीच काकतीवेस रोड येथे भाडेकरू म्हणून आलेल्या कुटुंबातील लहान बालिकेवर कुत्र्यांनी हल्ला केला. महानगरपालिकेने यावर ठोस उपाययोजना न केल्यास काकतीवेस रोड येथे रास्ता रोको करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. मनपाचे आरोग्य अधिकारी संजय डुमगोळ यांना स्थानिकांनी संपर्क साधून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
कुत्र्यांची नसबंदी करा…
काकतीवेस परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. लहान बालिकेवर हल्ला झाल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱयांना यासंदर्भात जाब विचारला असता बेळगाव शहरात 20 हजार भटकी कुत्री असून, आम्ही कोणावर म्हणून नियंत्रण ठेवणार, असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे एकतर कुत्र्यांची नसबंदी करा अथवा चावल्यानंतर विषबाधा होऊ नये यासाठी औषधोपचार करणे गरजेचे आहे. महानगरपालिकेने यावर कोणतीच कारवाई न केल्यास रास्ता रोको केला जाणार असल्याचे गणेश काळे यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.