प्रतिनिधी /बेळगाव
कुत्र्याला रक्ताची गरज असूनही रक्त देणे अशक्मय असल्याने एका कुत्र्याचा दुर्दैवी मृत्यू ओढवला.
ऍनिमिया म्हणजेच रक्तक्षयाने त्रस्त असलेल्या एका कुत्र्याला रक्ताची गरज होती. मात्र असे रक्त मिळण्याची सोय ब्लड बँकेत नाही.
हे समजल्यानंतर काकती येथील हा माझा धर्म पशु बचावच्या कार्यकर्त्यांनी त्या कुत्र्याला पशु वैद्यकीय दवाखान्यामध्ये नेले. पण तेथे त्यांनी असे रक्त उपलब्ध होऊ शकत नसल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी तसे पत्र व दुसऱया कुत्र्याचे रक्त आजारी कुत्र्याच्या शरीरात घातले. मात्र पुरेशे उपकरण व पुरेसे रक्त न मिळाल्याने त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. यामुळे कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सरकारने आपल्या नियमांत बदल करून प्राण्यांसाठी लवकरात लवकर रक्त उपलब्ध होईल, यावर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.