Tarun Bharat

शास्त्रीनगर,अनगोळ, भाग्यनगरात कुत्र्यांचा हैदोस

आठ दिवसांत अनेक मुले-नागरिकांवर हल्ला :  महापालिका अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणाची लहान मुले शिकार

प्रतिनिधी / बेळगाव

शहरातील भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र नसबंदी निविदा काढण्यात आल्याचे सांगून कुत्र्यांच्या बंदोबस्ताकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. परिणामी शास्त्राrनगर परिसरात भटक्मया कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन दिवसांत आठ बालके जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महापालिकेच्या अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणाची लहान मुले  शिकार बनली आहेत.

शहर आणि उपनगरात भटक्मया कुत्र्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात फोफावली असून रात्रीच्यावेळी घरातून बाहेर पडणे मुश्कील बनले आहे. तर शहराच्या विविध भागात लहान मुलांवर हल्ला केल्याने घराबाहेर सोडणे मुश्कील बनले आहे. भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. यापूर्वी महापालिकेच्या अधिकाऱयांची भेट देवून भटक्मया कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी करण्यात आली होती. पण प्राणी दया संघटनेच्या मागणीमुळे भटक्मया कुत्र्यांवर कोणतीच कारवाई करता येत नाही. केवळ नसबंदी मोहीम राबवून कुत्र्यांची संख्या रोखली जाऊ शकते. याकरिता लवकरच नसबंदी मोहीम राबविण्यात येणार असून निविदा काढण्यात येण्याची माहिती देवून मनपाच्या अधिकाऱयांनी जबाबदारी झटकली आहे. पण याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

मुलांवर हल्ला करण्याच्या प्रकारात वाढ

शास्त्राrनगर परिसरात एका कुत्र्याने उच्छाद मांडला असून, अनेक लहान मुलांवर हल्ला केल्याचे निदर्शनास आले आहे. शास्त्राrनगर परिसरात फिरणाऱया कुत्र्याने ये-जा करणाऱया नागरिकांवर गेल्या आठ दिवसांपूर्वी हल्ला केला होता. त्यामुळे नागरिकांनी नगरसेवक आणि महापालिकेच्या अधिकाऱयांकडे याबाबत तक्रार केली होती. पण कारवाईचे आश्वासन देवून याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र मनपा अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणाचा फटका नागरिकांना सोसावा लागत आहे. गेल्या दोन दिवसात आठ लहान मुलांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना निदर्शनास आली आहे. शास्त्रीनगर येथील सचिता विजय जोशी या सात वर्षाच्या मुलीवरही हल्ला करण्यात आला आहे.

कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करा

कुत्र्याच्या हल्ल्यामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शाळेला किंवा घराबाहेर मुलांना कसे पाठवायचे? असा मुद्दा उपस्थित होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नसबंदीमुळे केवळ कुत्र्यांची संख्या कमी होवू शकते पण ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याने शहरातील कुत्र्यांचे हल्ले कसे थांबविणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी ही बाब गांभीर्याने घेवून भटक्मया कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना राबवावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

तक्रारीनंतरही अतिक्रमणाकडे मनपाचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यातून खडा पहारासाठी सर्वाधिक नोंदणी करा

Patil_p

शहरासह ग्रामीण भागात वरुणराजाची सलामी

Omkar B

तहसीलदारांकडून अंगणवाडी पोषण आहार कामकाजाची पाहणी

Patil_p

‘दी गँरेज कॅफे’ येथे थाई फूड फेस्टिवलचे आयोजन

Amit Kulkarni

पूर ओसरल्याने नाला परिसरातील शेतकऱयांना दिलासा

Amit Kulkarni