केरळमधील मंदिरातील अजब प्रथा
दक्षिण भारतातील अनेक प्रथा-परंपरांबद्दल कित्येकांना माहितीच नसते. केरळमधील एका ठिकाणच्या प्रथेबद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही दंग व्हाल. केरळच्या कन्नूर जिल्हय़ात एक असे मंदिर आहे, जेथे लोक स्वतःच्या श्वानांना घेऊन येतात आणि त्याचे नामकरण करतात.
कन्नूरच्या तालीपरम्बापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर वलपट्टणम नदी असून त्याच्या काठावर हे मंदिर आहे. या मंदिराचे नाव मुथप्पन मंदिर असून दूर दूरच्या भागातून लोक स्वतःच्या पाळीव श्वानांना घेऊन येतात आणि मग येथे नामकरण केले जाते. येथे तिरुवप्पन वेल्लट्टम परंपरेदरम्यान श्वानांचे नामकरण होते. येथे श्वानांच्या नामकरणाचा सोहळा आयोजित होत असतो. याकरता कुठल्याही प्रकारची रक्कम घेतली जात नाही.
तिरुवप्पन वेल्लट्टम परंपरेवेळी कुणीही या मंदिरात स्वतःच्या पाळीव श्वानाला घेऊन येऊ शकतो आणि येथे आशीर्वाद प्राप्त करू शकतो. आठवडय़ाच्या अखेरीस म्हणजेच शनिवार आणि रविवारी येथे भाविकांची गर्दी दिसून येते. नामकरणादरम्यान श्वानाच्या कानाजवळ नावाचा उच्चार केला जातो आणि मग त्याला प्रसाद खायला दिला जात असल्याचे पुजाऱयांकडून सांगण्यात आले.
मुथप्पन हा गरीब आणि कष्टाळू लोकांचा देव मानला जातो. भगवान मुथप्पनला दाखविला जाणारा नैवेद्य देखील वेगळय़ाच प्रकारचा आहे. श्वानांना भगवान मुथप्पनचा साथीदार मानले जाते. या मंदिरात श्वान देखील पुजनीय आहेत.