अर्जुन कपूर अन् तब्बूचा चित्रपट
‘सबके सब कुत्ते है साले!’ या वाक्यासह सुरू होतो दिग्दर्शक आसमान भारद्वाज यांचा चित्रपट ‘कुत्ते’चा ट्रेलर. अर्जुन कपूर, तब्बू, कोंकणा सेन शर्मा, राधिका मदान यासारख्या कलाकारांनी नटलेला हा क्राइम थ्रिलर 13 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाचे नाव जितके वेगळे आहे तितकाच त्याचा ट्रेलर धमाकेदार आहे. डार्क ह्यूमर दर्शविणाऱया या चित्रपटात कुमुद मिश्रा, शार्दुल भारद्वाज आणि नसिरुद्दीन शाह यासारखे कलाकार देखील आहेत.
या चित्रपटात सरप्राइज पॅकेज म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते अनुराग कश्यप देखील भूमिका साकारताना दिसून येणार आहेत. ट्रेलरदरम्यान शाहिद कपूरचा चित्रपट ‘कमिने’चा टायटल ट्रकही वारंवार ऐकू येतो. स्वतःच्या मुलाच्या या पहिलया चित्रपटासाठी विशाल भारद्वाज यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्स या बॅनर अंतर्गत लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज यांच्याकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.