वार्ताहर /कांदोळी
नेरूल येथील श्री वाटेश्वर मंदिरात सोमवार उत्सवानिमित्त नवीनच बसविलेल्या श्री साखळेश्वर महिला घुमट आरती मंडळाने (स्वयंभू शक्ती) उत्कृष्ट घुमट आरतीचे सादरीकरण मंदिरातील भाविकांना पहायला मिळाले. यावेळी उत्कृष्ट घुमटवादन, कासाळेवादन, समेळवादन व स्वरचित आरतीचे ताल व लय पाहून भाविकांनी या मुलींवर कौतुकाची थाप मारली. सध्या नेरूल गावात संगीतवर्ग सुरू आहेत. या संगीत वर्गाचा नेरूल येथील सुमारे 15 युवती लाभ घेत आहेत. सर्व मुली आपले शिक्षण पूर्ण करून घुमट आरती कला आत्मसात करीत आहेत. या संगीत वर्गास संगीत शिक्षक केतन साळगावकर यांनी घुमट आरतीचे शिक्षण दिले आहे. ‘स्वयंभू शक्ती’ या नावाने सुरू केलेल्या घुमट आरतीचा शुभारंभ नुकताच साखळेश्वर वाटेश्वर मंदिरात करण्यात आला. या मंदिराच्या महाजनांनी घुमट आरतीच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल सर्व मुलींना श्री गणपतीची छोटी मूर्ती दिली.