प्रतिनिधी /पेडणे
येथील लोकमान्य गणेशोत्सव विश्वस्त मंडळाच्या सन 2022- 23 यावषीच्या गणेश उत्सवाच्या लॉटरी कुपन विक्री शुभारंभ येथील सेवाभावी डॉ. देवीदास शिरोडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावषी लोकमान्य गणेशोत्सव विश्वस्त मंडळ 26 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यावेळी डॉ शिरोडकर यांनी सलग 26 वर्षे आपल्याच हस्ते लॉटरी शुभारंभ केल्याबद्दल मंडळाचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रामा सावळ देसाई, उपाध्यक्ष राजू बोंदे, चिटणीस श्रीधर शेणवी देसाई, सचिव सदानंद सावळ देसाई,खजिनदार चंद्रकांत सांगळे, उत्सव समितीचे अध्यक्ष रामचंद्र शेणवी देसाई, उपाध्यक्ष राकेश स्वार, सुनिल नाईक, खजिनदार गजानन शिरोडकर, विजय गुरव, कांता आसोलकर, गुंडू राऊळ, शांताराम गुरव, दिपक सावळ देसाई, किशोर किनळेकर, प्रदिप कोरगावकर ,सिद्धेश पेडणेकर, नंदू साळगावकर, विनायक सावळ देसाई,जगदीश देशप्रभु, प्रकाश शेटय़? आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरवातीस सदानंद सावळ देसाई यांनी प्रातविक व स्वागत केले, रामा सावळ देसाई यांनी पुष्पगुच्छ प्रदान केले तर राजू बोंदे यांनी आभार मानले.