वार्ताहर /किणये
मंडोळी गावातील नवदांपत्य विनायक अजित पाटील व प्रियांका विनायक पाटील यांनी किल्लेश्री रायगडावर होत असलेल्या 32 मन सुवर्ण सिंहासनासाठी 11 हजार 111 रुपयांची देणगी दिली आहे. लग्नसोहळ्यानिमित्त छ. शिवाजी महाराजांच्याप्रती असलेला आदर त्यांनी दाखवून दिला आहे. लग्नकार्यात इतर होणारा खर्च टाळून त्यांनी सदर देणगी दिली आहे. या नवदांपत्याचे व विनायक यांचे विशेष कौतुक शिवप्रेमी भक्तांनी केले आहे. सदर धनादेश शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे व इतरांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.