Tarun Bharat

बिजगर्णीतील छत्रपती शिवाजी महाराज चौथऱयासाठी अडीच लाखांची देणगी

Advertisements

वार्ताहर /किणये

बिजगर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारण्यासाठी चौथऱयाचे बांधकाम करण्यात येत आहे. यासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्याकडून अडीच लाखांची देणगी देण्यात आली.

बिजगर्णीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांची मूर्ती होती. त्याच ठिकाणी चौथरा बांधून परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. अडीच लाखांची देणगी मिळाल्यामुळे सदर काम उत्तम दर्जाचे व आकर्षक होणार आहे, असे गावातील शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी सांगितले.

देणगीची रक्कम ग्रा. पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांनी मंडळाचे उपाध्यक्ष रवि जाधव यांच्याकडे दिली. यावेळी ग्रा. पं. सदस्य संतोष कांबळे, बबलू नावगेकर, भावकू तारीहाळकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले. दिलीप कांबळे यांनी आभार मानले.

Related Stories

बसथांब्याअभावी प्रवासी उन्हात ताटकळत

Amit Kulkarni

बाजारात शाळांसंदर्भातील साहित्याची रेलचेल

Amit Kulkarni

दिव्यांग मुलांनाही व्यासपीठ मिळणे आवश्यक

Amit Kulkarni

शहर हेस्कॉम कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

Patil_p

सकल मराठा समाजाच्या कार्यालयाचे उद्घाटन

Patil_p

इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जिल्हा शाखेतर्फे रेडक्रॉस दिन साजरा

Amit Kulkarni
error: Content is protected !!