रिक्षाचालक-मालक संघटना-पोलीस महासंघाचा उपक्रम
बेळगाव : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ज्योती सेंट्रल शाळेच्या वर्दी रिक्षाचालक आणि मालक संघटना व पोलीस महासंघाच्यावतीने रविवारी अनाथाश्रमामध्ये आवश्यक साहित्य व फळांचे वाटप करण्यात आले. शहरात सर्वत्र दिवाळी साजरी केली जात आहे. अनाथाश्रमामधील मुलांना दिवाळीचा आनंद घेता यावा या उद्देशाने मुलांसाठी विविध साहित्य देण्यात आले. रिक्षाचालक आणि मालक संघटनेतर्फे समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात येतात. या अंतर्गत रविवारी दोन अनाथाश्रमांना भेटवस्तू देण्यात आल्या. नंदन मक्कळ धाम आणि कुडची येथील वृद्धाश्रमात उपयोगी साहित्य देण्यात आले. यावेळी संघटनेचे दीपक कंग्राळकर, सचिन गोजगेकर, विनोद पवार, संतोष कडबनी, हणमंत चौगुले व इतर उपस्थित होते.