अभिनेत्रीकडून मोटिव्हेशनल पोस्ट शेअर
मलायका अरोरा स्वतःचा फिटनेस आणि फॅशन सेन्ससाठी चर्चेत असते. मलायका अनेकदा स्वतःचे चाहते आणि फॉलोअर्स यांच्यासाठी मॉर्निंग मोटिव्हेशनल आणि प्रेरणादायी कोट्स शेअर करत राहते. बुधवारी देखील तिने एक मोटिव्हेशनल कोट्स शेअर केला असून यात ‘अपयशाला घाबरू नका’ असे नमूद आहे.
स्वतःच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने जॅक कॅनफील्डचा कोट्स शेअर केला आहे. ‘अपयशांबद्दल चिंता करू नका, ज्या संधी तुम्हा गमावता, जेव्हा तुम्ही प्रयत्नही करत नाही अशा क्षणांबद्दल चिंता करा’ असे यात म्हटले गेले आहे. तसेच तिने मोठय़ा बॅकपॅकसह शिखरावर बसलेल्या एका युवतीचे छायाचित्र शेअर केले आहे. मलायकाची ही पोस्ट सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल झाली आहे.
मलायका सध्या बॉलिवूड चित्रपटांपासून दूर असली तरीही सदैव चर्चेत असते. कधी स्वतःच्या ग्लॅमरस छायाचित्रांद्वारे ती प्रसिद्धीच्या झोतात असते तर कधी अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे ती चर्चेचा विषय ठरते. मलायकाला अलिकडेच कार अपघाताला सामोरे जावे लागले होते. यात ती किरकोळ जखमी झाली होती.