Tarun Bharat

मुलांचे अपहरण अफवांना बळी पडू नका

Advertisements

द. गोवा पोलीस अधिक्षकांचे पत्रकार परिषदेत आवाहन

प्रतिनिधी /मडगाव

मुलांचे अपहरण नावाने सध्या समाज माध्यमावर चालू असलेल्या अफवांना गोवेकरांनी बळी पडू नये असे आवाहन दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी बुधवारी केले. मडगावातील द. गोवा पोलीस मुख्यालयात घेतलेल्या एक पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सध्या दक्षिण गोव्यात सध्या अशा प्रकारच्या 3 घटना घडल्याचे निदर्शनाला आणून दिलेले असले तरी चौकशी केली तेव्हा असा कोणताच प्रकार घडलेला नसल्याचे श्री. धनिया यांनी पत्रकारांच्या नजरेला आणून दिले. गैरसमजातून असा प्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले.

मोतीडोंगर-मडगाव, फातोर्डा व वास्को येथे एकूण तीन प्रकार झाल्याची सकृत दर्शनी माहिती मिळाली होती. मात्र, चौकशीत असा कोणताच प्रकार झाला नसल्याचे दिसून आलेला असल्याची माहिती श्री. धनिया यांनी दिली.

Related Stories

ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!

Amit Kulkarni

बंदराची मर्यादा नाकारून गोवा विकण्याचा भाजपचा डाव : काँग्रेस

Amit Kulkarni

पर्यटन व्यवसायाला पुन्हा अच्छे दिन

Amit Kulkarni

अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी युवकाला अटक

Amit Kulkarni

ॐ नित्य दिव्य योगाश्रमतर्फे अखिल गोमंतक योगासन, सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni

डिचोलीत शालेय वस्तू खरेदीसाठी झुंबड

Patil_p
error: Content is protected !!