Tarun Bharat

शिवबंधन नको!महाविकास आघाडीतून संधी द्या: संभाजीराजेही भूमिकेवर ठाम

मुंबई: राज्यसभेसाठी शिवसेनेच्या सहाव्या उमेदवाराला पाठिंबा असेल, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी जाहीर करून संभाजीराजे छत्रपती यांची कोंडी केली होती. तर शिवसेनेने देखील सोमवार पर्यंत संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करून राज्यसभा निवडणूक लढवावी,असा अल्टीमेंटम दिला होता. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दबावाला न जुमानता संभाजीराजे देखील आपल्या भूमिकेशी ठाम आहेत. शिवसेनेने ऑफर धुडकावून लावत शिवबंधन नको, पण महाविकास आघाडीकडून संधी द्या. अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेचा गुंता अधिक वाढताना दिसत आहे.

संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्याची संभाजीराजे यांच्याकडून मागणी झाल्याची माहिती आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Advertisements

उद्या दुपारी १२ वाजता संभाजीराजे छत्रपती यांनी अधिकृत पक्षप्रवेश करावं, त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात येईल असा निरोप मुख्यमंत्र्यांच्या वतीनं संभाजीराजेंना देण्यात आला होता. यावर शिवसनेचे नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंसोबत फोनवरुन चर्चा केली होती. आता शिवसेनेची ही ऑफर संभाजीराजेंनी नाकारल्याची माहिती आहे.

Related Stories

तीस वर्षांपूर्वीची रहिवासी अतिक्रमणे कायम करणार

Abhijeet Shinde

तैलचित्रावरुन जिल्हा परिषद सभेत गोंधळ

Patil_p

दिलासाः सांगली जिल्हय़ात तब्बल 489 रूग्ण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

तळीरामांना मिळणार घरबसल्या दारु

Abhijeet Shinde

जिल्हापरिषद शाळांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 11 मे पासून : शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांची माहिती

Abhijeet Shinde

राजनाथ सिंह यांनी लोकसभेत हेलिकॉप्टर दुर्घटनेचा सांगितला घटनाक्रम

Abhijeet Shinde
error: Content is protected !!