उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर : मंदिर तसेच धबधबा परिसरात मद्यपान न करण्याचे आवाहन
प्रतिनिधी/सांखळी
डिचोली तालुक्मयातील प्रसिद्ध हरवळे येथील श्रीरुदेश्वर देवस्थान आणि परिसरातील पर्यटनस्थळ म्हणजे सुप्रसिद्ध हरवळे धबधबा, पावसाळय़ात जगभरातील पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला असून हरवळे धबधबाही बऱयापैकी सक्रिय झाला आहे
तेव्हा कोणीही पर्यटकांनी धबधब्याच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरू नये, असे आवाहन डिचोली उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी मंगळवारी दि. 28 रोजी पत्रकारांशी बोलताना केले.
तसेच सरकारने या ठिकाणी दोन सुरक्षा रक्षक तैनात केले असून पर्यटन खात्याकडे ही सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याबाबत कळविण्यात आले आहे. मंदिर परिसरात आणि धबधब्याच्या कडेला कोणीही मद्यपान करून जाऊ नये, असे ही वायंगणकर म्हणाले.
धबधब्यावर आंघोळ करण्यास बंदी हवी : स्थानिक
डिचोली तालुक्मयातील सुंदर अशा या पर्यटन स्थळावर आतापर्यंत अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही सरकारने या ठिकाणी सुरक्षेबाबत अजूनही गंभीरपणे दखल घेतल्याचे दिसत नाही. अशी तक्रार स्थनिकांकडून होत आहे. पावसाळय़ात स्थनिक तसेच राज्याबाहेरील पर्यटक येथे मोठय़ा संख्येने ये असल्याने येथे विशेष साधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन खात्याने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. स्थनिक आमदार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या समस्येवर विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
पत्रकार सुरेश बायेकर यांचे अभिनंद : माडकर
गोव्यातील भांडरी समाज संचलित श्री रूदेश्वर देवस्थान परिसरात एक सुंदर पर्यटन स्थळ असून येथील हरवळे धबधबा पावसाळय़ात खूपच आकर्षक
वाटत आहे. जगभरातील पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी येत असतात. मात्र सरकारचे पर्यटन खाते आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्याने येथे चांगला प्रकल्प उभा राहणार आहे. पोलीस यंत्रणेचे चांगले सहकार्य लाभत आहे. तरीही धबधब्याच्या पाण्यात आंघोळीसाठी जातात आणि बुडुन मृत्यू होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे देवस्थानचे नाव खराब होते. शनिवारी पाण्यात उतरणाऱया राजस्थान येथील पर्यटकांना वेळीच सावध करून पाण्यातून बाहेर येण्याची विनंती करणारे दै तरुण भारतचे प्रतिनिधी सुरेश बायेकर आणि त्यांचे मित्र मंगलदास नाईक हे खरच अभिनंदनास पात्र ठरतात, असे देवस्थान अध्यक्ष यशवंत माडकर यांनी या विषयी बोलताना सांगितले.