Tarun Bharat

वर्ध्यातील डिजिटल युनिव्हर्सिटीत प्रवेश नको; UGC चे आवाहन

Advertisements

पुणे / प्रतिनिधी :

राज्यातील वर्धा येथे असलेल्या ‘डिजिटल युनिव्हर्सिटी ऑफ स्कील रीसर्जन्स’मध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) विद्यार्थ्यांना केले. कायद्यानुसार स्थापना न झाल्याने संबंधित विद्यापीठाला पदवी देण्याचा अधिकार नसून या विद्यापीठात प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, असे यूजीसीने नोटिशीद्वारे मंगळवारी स्पष्ट केले.

यूजीसीने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या नोटिशीनुसार, यूजीसी अधिनियम 1956 चे उल्लंघन करून डिजिटल युनिव्हर्सिटी ऑफ रीसर्जन्सकडून अभ्यासक्रम राबवले जात आहेत. यूजीसी अधिनियमातील कलम 22 नुसार केंद्रीय कायदा, प्रोव्हिजन, राज्य कायद्यानुसार स्थापन केलेले विद्यापीठ किंवा कलम तीननुसार स्थापन अभिमत विद्यापीठ विद्यार्थ्यांना पदवी देण्यास पात्र असते. संसदेत पारित केलेल्या कायद्यानुसार, स्थापन केलेले विद्यापीठही पदवी देण्यासाठी प्राधिकृत आहे. मात्र, डिजिटल युनिव्हर्सिटी ऑफ स्कील रीसर्जन्स यापैकी कोणत्याही विभागात समाविष्ट नसल्याचे यूजीसीने नमूद केले आहे.

केंद्रीय, प्रोव्हिजनल, राज्य कायद्यानुसार स्थापन झालेल्या संस्थेलाच नावामध्ये विद्यापीठ हा शब्द वापरता येतो. मात्र, युजीसी अधिनियमांचे उल्लंघन करून ‘डिजिटल युनिव्हर्सिटी ऑफ स्कील रीसर्जन्स’कडून अभ्यासक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे संबंधित विद्यापीठातील अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचे आवाहन युजीसीकडून करण्यात आले.

हेही वाचा : खासदार श्रीरंग बारणे शिंदे गटात सामील

Related Stories

तौत्के चक्रीवादळाचा महावितरणला तडाखा

Tousif Mujawar

‘मी गातो माझे गाणे’ मधून शब्द -अर्थ वैविध्याची स्वरमैफल

Tousif Mujawar

अविनाश भोसलेंना दिलासा, न्यायालयाने ईडीला दिले ‘हे’ आदेश

Archana Banage

अनिल परबानंतर सोमय्यांचा ठाकरे परिवाराकडे मोर्चा, दिला थेट इशारा

Archana Banage

पुण्यात स्कूलबस चालकांच्या कुटुंबांना धान्यरुपी मदत

Tousif Mujawar

संजय राऊत आणि आमच्यात बोलणं झालं, पण लढाई सुरुच-नवनीत राणा

Archana Banage
error: Content is protected !!