बेळगाव : बेळगाव जिल्हा टेबल टेनिस संघटना आयोजित विनया कोटियान स्मृती चषक राज्यस्तरीय मानांकीत टेबल टेनिस स्पर्धेत 19 वर्षांखालील गटात दिस्ना वंशिका, अभिनव मूर्ती यांनी दुहेरी मुकुट तर सिद्धांत धारिवाल, निती अगरवाल यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले.
बेळगाव क्लबच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या टेबल टेनिस स्पर्धेत महिलांच्या गटात पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात दिस्ना वंशिका वि. वि. तनिष्का काळभैरवचा 11-9, 9-11, 11-9, 10-12, 11-8, 11-4 तर दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात खुशी व्ही. वि. वि. निती अगरवाल 11-1, 12-10, 11-5, 12-10 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात दिस्ना वंशिकाने खुशी व्हीचा 11-2, 11-6, 11-3, 11-8 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून तर पुरूष विभागात पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात अभिनव मूर्ती वि. वि. श्रीकांत काशप 11-8, 11-6, 11-2, 9-11, 6-11, 11-4 अशा सेटमध्ये तर दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात रक्षित आर वि. वि. बी. आर. गुरव 12-10, 11-8, 11-7, 11-5 अशा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात अभिनव मूर्तीने रक्षित आरचा 11-3, 11-7, 7-11, 11-8, 6-11, 11-9 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले.
17 वर्षांखालील मुलांच्या गटात पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सिद्धांत धिरवाल वि. वि. आर्नव एन 5-11, 9-11,12-10,12-10,11-9 अशा सेटमध्ये तर दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात तेशुभ दिनेशने वि. वि. वैभव व्ही. जी. चा 13-11, 11-4,13-11 अशा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात सिद्धांत धिरवालने तेशुभ दिनेशचा 11-1, 12-10, 11-9 असा पराभव करून तर मुलींच्या विभागात पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात शिवानी महिंद्रन वि. वि. प्रेक्षा टिटलवटचा 11-7, 11-3, 10-12, 5-11, 13-11 अशा सेटमध्ये तर दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात निती अगरवालने हिमांशी चौधरीचा 11-6, 11-9, 10-12, 11-9 पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात निती अगरवालने शिवानी महिंद्रनचा 11-6, 11-3, 3-11, 11-9 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले.