Tarun Bharat

फिनिक्स चषक स्पर्धेत आरसीसी शिरोडा संघाला दुहेरी मुकुट

बेळगाव : होनगा येथील फिनिक्स रेसिडेन्सियल स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रितांच्या आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेत 16 व 14 वर्षाखालील गटात आरसीसी शिरोडा संघाने विजया क्रिकेट अकादमी व एमसीसी संघांचा पराभव करून दोन्ही गटात विजेतेपद पटकाविले. मनीषला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

या निमंत्रितांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात आरसीसी शिरोडा संघाने अंतिम सामन्यात विजया क्रिकेट अकादमीचा पराभव केला तर 16 वर्षाखालील गटात एमसीसी संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. 16 वर्षाखालील गटात उत्कृष्ट फलंदाज श्वनेश शिरोडा, उत्कृष्ट गोलंदाज विनित लोटलीकर, सामनावीर श्वनेश, उत्कृष्ट गोलंदाज विदित लोटलीकर, अंतिम सामन्यातील सामनावीर सानेश बुवा यांना पुरस्कार देण्यात आले.

14 वर्षाखालील गटात विघ्नेश घाडी शिरोडा, उत्कृष्ट गोलंदाज निश्चल (विजया अकादमी) यांना प्रमुख पाहुणे अश्विन नाईक, गिरीष नाईक, प्राचार्य सर्फूनिशा सुभेदार, माजी प्राचार्या अलका पाटील, गौस हाजी, सुनील देसाई यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

Related Stories

‘हा माझा पशु बचाव दला’च्यावतीने कोरोनायोद्धय़ांचा सत्कार

Amit Kulkarni

किराणा दुकानात दारू विकणाऱया दोघा जणांना अटक : काकती पोलिसांची कारवाई

Amit Kulkarni

परिवहनच्या बस सोडताहेत धूर

Omkar B

चळवळीचा आत्मा म्हणजे रावजी आप्पा

Amit Kulkarni

शिक्षक, पदवीधरांना चिंतनाची गरज

Omkar B

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सज्जता

Amit Kulkarni