Tarun Bharat

राज्य फुटबॉल स्पर्धेत संत मीराला दुहेरी मुकुट

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

धारवाड येथील गरक आरव्हीके विद्याकेंद्र स्कूल आयोजित कर्नाटक राज्य विद्याभारती पुरस्कृत धारवाड विद्याभारती जिल्हा आयोजित राज्यस्तरीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या संत मीराच्या प्राथमिक व माध्यमिक फुटबॉल संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवून दुहेरी मुकुट पटकाविला आहे.

गरक येथे झालेल्या स्पर्धेत धारवाड, गुलबर्गा, मंगळूर, बेंगळूर, बेळगाव जिल्हय़ातील प्राथ. व माध्य. शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. प्राथमिक गटात पहिल्या उपांत्य सामन्यात संत मीरा संघाने मंगळूर संघाचा 1-0 असा पराभव केला. संत मीरातर्फे अब्दुल मुल्लाने गोल गेला. दुसऱया उपांत्य सामन्यात धारवाड संघाने बेंगळूर संघाचा 3-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात संत मीरा संघाने धारवाड संघाचा अटीतटीच्या सामन्यात 1-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.

माध्यमिक गटात पहिल्या उपांत्य सामन्यात आरव्हीके धारवाड संघाने बेंगळूर संघाचा 6-0 असा पराभव केला तर दुसऱया उपांत्य सामन्यात संत मीरा संघाने मंगळूर संघाचा 1-0 असा निसटता पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात संत मीरा संघाने आरव्हीके धारवाड संघाचा 1-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.

स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे कुमारस्वामी कुलकर्णी, राघवेंद्र आंबेकर, मुख्याध्यापिका अनिता रै, महांतेश दिग्गावी व श्रीनिवास यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या संघाला क्रीडा शिक्षक सी. आर. पाटील, निरंजन सावंत, मयुरी पिंगट, गौतम तेजम यांचे मार्गदर्शन लाभले. या संघांचे चेअरमन परमेश्वर हेगडे, राघवेंद कुलकर्णी, सुजाता दप्तरदार, ऋतुजा जाधव, आशा कुलकर्णी यांनी खास कौतुक केले.

Related Stories

वीरभद्रनगर येथे चाकुहल्ल्यात दोघे जखमी

Patil_p

खानापूर म. ए. समितीचे हेस्कॉम-तहसीलदारांना निवेदन

Omkar B

तनिष्कतर्फे सणासुदीसाठी ‘उत्साह’ खास कलेक्शन

Amit Kulkarni

मुचंडी येथील प्लंबरचा हलकर्णी येथे मृत्यू

Patil_p

युवा समितीतर्फे येळ्ळूर मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण

Amit Kulkarni

शिक्षक बदली प्रक्रियेला हिरवा कंदील

Omkar B
error: Content is protected !!