प्रतिनिधी / बेळगाव : बेळगावजवळील शिंदोळी गावात दोन तरुणांची धारदार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली आहे.
सांबऱ्या जवळील शिंदोळी येथे डबल मर्डरच्या घटनेमुळे खळबळ माजली होती. मारिहाळ पोलिस यासंबंधी तपास करत आहेत. या हल्ल्यात बसवराज बेळगावकर, गिरीश नगुनावर यांचा मृत्यू झाला आहे. सुळेभावी येथेही मर्डरची घटना ताजी असताना शिंदोळी येथेही दुहेरी मर्डर झाला आहे. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
शिंदोळी गावात क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेनंतर घरी परतत असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.