Tarun Bharat

स्वातंत्र्य सैनिकांचा अमृतमहोत्सवी सन्मान

पेन्शनच्या रक्कमेत दुप्पटीने वाढ : जिल्हयातील 171 जणांना लाभ : राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय : स्वातंत्र्य सैनिक संघटनेकडून स्वागत

प्रवीण देसाई/कोल्हापूर

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकारने स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला आहे. पेन्शनच्या रक्कमेत दुप्पटीने वाढ करत त्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे आता 10 हजार ऐवजी 20 हजार रुपये पेन्शन त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वातंत्र्य सैनिक संघटनेकडून स्वागत करण्यात आले आहे. जिह्यातील 171 जणांना याचा लाभ होणार आहे.

स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे जोडीदार यांना सध्या 10 हजार रुपये निवृत्तीवेतन (पेन्शन) मिळत आहे. यामध्ये वाढ करावी, यासाठी गेल्या 10 वर्षांपासून स्वातंत्र्य सैनिक संघटना व लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे. यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री यांच्याशीही अनेकवेळा पत्रव्यवहार झाला आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला. त्याला सर्वानुमते मंजुरी देऊन शासन निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पेन्शनची रक्कम 10 हजार रुपयांवरुन 20 रुपये करण्यात आली. याची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून सुरु होईल. त्यानुसार जानेवारी महिन्यात ही वाढीव पेन्शन संबंधितांच्या खात्यावर जमा होणार आहे.

या निर्णयामुळे सध्या सुरु असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सरकारने स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मानच केल्याचे दिसत आहे. याचा लाभ जिह्यातील 171 जणांना होणार आहे. यातील 6 स्वातंत्र्य सैनिक हयात आहेत. तर 165 स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवा पत्नींचा समावेश आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वातंत्र्य सैनिकांकडून स्वागत होत आहे.

जिह्यातील स्वातंत्र्य सैनिक व विधवा पत्नी
तालुका स्वातंत्र्य सैनिक व विधवा पत्नी
करवीर 53 (पैकी 2 हयात)
कागल 21 (पैकी 2 हयात)
पन्हाळा 6
शाहूवाडी 6
हातकणंगले 28
शिरोळ 32 (पैकी 1 हयात)
भुदरगड 7
राधानगरी 7(HewkeÀer 1 हयात)
गडहिंग्लज 5
चंदगड 3
गगनबावडा –
आजरा ö –

इतर जिल्हा 3

कोट….
स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनवाढीसाठी गेल्या 10 वर्षांपासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरु आहे. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनाही याबाबत निवेदने दिली आहे. सरकारचे याची दखल घेऊन पेन्शनवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल सरकारचे धन्यवाद आहेत.
-वसंतराव माने, जिल्हाध्यक्ष, स्वातंत्र्य सैनिक संघटना
——————-ö
स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा शासन निर्णय झाला आहे. त्यानुसार अंमलबजावणी होणार आहे. जिह्यात 171 पेन्शनधारक असून त्यांच्या खात्यावर जानेवारी महिन्यापासून ही वाढीव रक्कम जमा होणार आहे.
-संतोष कणसे, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय

Related Stories

ऑनलाईन जनगणनेची तयारी

Patil_p

राज्यात चोवीस तासांत 48 नवे रुग्ण

Tousif Mujawar

बार्देश भंडारी समाजाची बैठक ठरली वादळी

Omkar B

पार्किंगला शिस्त लावण्यासाठी मुख्याधिकारी रस्त्यावर

Archana Banage

पानालय

Patil_p

आजऱ्यात 13 रोजी किसान आंदोलन विजयी मिरवणूक

Abhijeet Khandekar