Tarun Bharat

डोवाल यांच्या सुरक्षेत चूक, 3 कमांडोंना हटविले

Advertisements

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीप्रकरणी केंद्र सरकारने मोठी कारवाई करत तीन कमांडोंना हटविले आहे. फेब्रुवारी महिन्यात डोवाल यांच्या दिल्लीतील निवासस्थानाच्या परिसरात एका कारने शिरण्याचा प्रयत्न केला होता. या कारमधील इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. डोवाल यांच्या व्हीआयपी सुरक्षेशी निगडित उपमहानिरीक्षक आणि कमांडेटची बदली करण्यात आली आहे. डोवाल यांच्या अत्याधिक सुरक्षाप्राप्त निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्न करणारा इसम एका कारमध्ये होता. वेळीच कारला इंटरसेप्ट करत संबंधित इसमाला सीआयएसएफ जवानांनी पकडले होते.

आपल्या शरीरात एक चिप बसविण्यात आली असून ती अन्य ठिकाणाहून नियंत्रित केली जात असल्याचा दावा संबंधित इसम म्हणजेच शांतनू रेड्डीने केला होता. एमआरआय स्कॅनमध्ये त्याच्या शरीरात कुठल्याही प्रकारची चिप आढळून आली नव्हती. शांतनू रेड्डी हा मूळचा बेंगळूरचा रहिवासी असून तो मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ होता. नोएडा येथून त्याने एक कार भाडेतत्वावर मिळविली होती. डोवाल यांनी केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे. तर संबंधित घटनेवेळी डोवाल हे स्वतःच्या निवासस्थानीच होते.

Related Stories

नवी वेतनसंहिता एप्रिलपासून?

Patil_p

‘सप’वर भाजपचा काउंटर अटॅक

Patil_p

देशद्रोह कायद्यात परिवर्तनाचे संकेत

Patil_p

आंध्र प्रदेश : हैदराबादमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के!

Rohan_P

नमाज पठण करण्यासाठी चारमिनार खुला करा – काँग्रेस नेते राशिद खान

Abhijeet Shinde

थ्रीडी प्रिंटिंग हाउस केवळ 5 दिवसांमध्ये तयार

Patil_p
error: Content is protected !!