आता आयबीएम व एसएपीचीही कर्मचारी कपातीची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुगल, ऍमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट या सारख्या मोठय़ा टेक कंपन्यांनंतर आता आयबीएम कॉर्प आणि जर्मन सॉफ्टवेअर फर्म एसएपी यांनी देखील टाळेबंदी केली आहे. प्राप्त अहवालानुसार, आयबीएम कॉर्पने आपल्या एकूण जागतिक कर्मचाऱयांमधून 3,900 (1.5टक्के) कर्मचाऱयांना कामावरून कमी केले आहे. त्याच वेळी, एसएपीने 3,000 (2.5टक्के) कर्मचाऱयांना काढून टाकण्याची योजना आखली आहे. आयबीएमने मालमत्ता पुनर्गुंतवणुकीचा एक भाग म्हणून टाळेबंदीची घोषणा केली असल्याचे सांगितले. वास्तविक, कंपनीने चौथ्या तिमाहीत वार्षिक रोखीचे लक्ष्य चुकवल्यानंतर हा निर्णय घेतला.
अनेक मोठय़ा टेक कंपन्यांमध्ये टाळेबंदी
आयबीएम आणि एसएपी याच्या अगोदर गुगल, ऍमेझॉन, मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि स्पॉटीफाय सारख्या तंत्रज्ञान उद्योगातील अनेक कंपन्यांनी देखील खर्चात कपातीमुळे मोठय़ा प्रमाणात टाळेबंदी केली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, स्पॉटिफाय या आठवडय़ाच्या सुरुवातीला टाळेबंदीची घोषणा करेल. असे सांगितले जात आहे की स्पॉटिफाय त्याच्या एकूण कर्मचाऱयांपैकी 6टक्के (9,800 कर्मचारी) कर्मचाऱयांना काढू शकते.