Tarun Bharat

डीपी, फिनिक्स पब्लिक उपांत्य फेरीत

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिल आयोजित फिनिक्स चषक 17 वर्षाखालील मुलींच्या उपांत्यपूर्व सामन्यात डीपी संघाने जीजी चिटणीस संघाचा तर फिनिक्स पब्लिक संघाने संत मीरा संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात डीपी संघाने जीजी चिटणीस संघाचा पेनल्टी शूटआऊटवर 4-3 असा पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. त्यामुळे पंचांनी टायब्रेकर नियमांचा वापर केला. त्यामध्ये डीपी संघाने 4-3 अशा गोलफरकाने विजय मिळविला. डीपीतर्फे श्रुती नायकवाडी, समृद्धी हीब्बळ, विभावरी देसाई व फिलोमा डिसोझा यांनी गोल केले तर चिटणीसतर्फे निशा गवळी, नेहा तोरणकर, रिया जांबोटकर यांनी गोल केले.

दुसऱया उपांत्यपूर्व सामन्यात फिनिक्स पब्लिक संघाने संत मीरा संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात दुसऱया सत्रात 42 व्या मिनिटाला तनुष्का तुबचीने गोल केले, तोच अखेर निर्णायक ठरला. संत मीराला बरोबरीची संधी मिळाली होती. पण ती त्यांना साधता आली नाही.

शनिवारचे उपांत्य सामने-सेंट जोसेफ वि. डीपी सकाळी 10 वा., फिनिक्स पब्लिक वि. सेंट झेवियर्स सकाळी 11 वा.

Related Stories

सर्व्हरडाऊनची समस्या तातडीने सोडवा

Amit Kulkarni

राज्यातील ड्रग्ज माफियांवर कारवाई करा

Patil_p

हृदयशस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

Amit Kulkarni

सुरळीत वीजपुरवठय़ासाठी नव्या वीजवाहिन्या

Omkar B

बेळगावात एका दिवसात 17 अहवाल पॉझिटिव्ह

Patil_p

निवडणूक कर्तव्यावरील एएसआयचा हृदयाघाताने मृत्यू

Amit Kulkarni
error: Content is protected !!