बांदा / प्रतिनिधी
Dr. Ambedkar Jayanti celebrations at Degwe-Phanswadi!
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावच्या फणसवाडीतील सिध्दार्थनगरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी.केली.सदर कार्यक्रम सिध्दार्थनगरातील समाज मंदिरात स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायत डेगवे यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा केला.सर्व प्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलन करुन पुष्पहार प्रदान करण्यात आला.यावेळी उपस्थित डेगवे गावातील मान्यवरांची समयोचित.भाषणे झाली.त्यामुळे उपस्थितश्रोते मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमास.उपस्थित राहिल्या बध्दल डेगवे ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसंरपच,तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य तथा इन्सुली शिवसेना विभाग प्रमुख श्री विजय देसाई यांचे श्री सदानंद देसाई यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डेगवे-सिध्दार्थनगरातील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले आहेत.