पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर यांची निवड करण्यात आली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली.
अहमदाबाद येथील इंडियन इंस्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेन्ट (आयआयएम) मधून व्यवसाय प्रशासन या विषयात डॉ. पालकर पदवीधर आहेत. मागील दोन दशकांहून अधिक काळ व्यवसाय प्रशासन विषय त्या शिकवत असून, या क्षेत्रात त्या संशोधनही करत आहेत. व्यवस्थापन, विज्ञान अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय प्रवेश परीक्षा आयोजित करणाऱया समितीच्या प्रमुख म्हणूनही त्या सक्रिय होत्या. राज्य सरकारने स्थापन केलेल्या शिक्षण समित्यांमध्येही डॉ. पालकर यांचा सहभाग आहे.
हेही वाचा : दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी फॉर्म 17 भरण्याची सुविधा उद्यापासून