उत्तरमधील मतदारांनी डॉ. रवी पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांचा विजय निश्चित आहे. भाजपने आतापर्यंत सुशिक्षित उमेदवारांना तिकीट दिले असून समाजाला पुढे आणण्याची जिद्द त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे बेळगाव उत्तरमधील मतदारांनी डॉ. रवी पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन महाराष्ट्रातील राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी केले. शुक्रवारी खासदार धनंजय महाडिक यांनी डॉ. रवी पाटील यांच्या प्रचारार्थ यमनापूर परिसरात पदयात्रा काढत प्रचार केला. डॉ. रवी पाटील यांना संपूर्ण मतदारसंघातून उत्तम पाठिंबा मिळत असून नागरिकांनी सुशिक्षित चेहऱ्याला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. अलारवाड येथील आंबेडकर गल्ली तसेच आसपासच्या परिसरात प्रचार करण्यात आला. जनता कॉलनी येथे डॉ. रवी पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. याचबरोबर शनिवार खूट येथील व्यापाऱ्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. खंजर गल्ली, खडेबाजार येथील दुकानदारांनी डॉ. रवी पाटील यांना पाठिंबा दर्शविला. भोई गल्लीत झालेल्या बैठकीत नागरिकांच्या समस्या जाणून घेत निवडून आल्याबरोबर त्या दूर केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. माळी गल्ली, आझाद गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, कसाई गल्ली, कामत गल्ली आदी परिसरातून डॉ. रवी पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यात आला.
आजचा प्रचाराचा मार्ग
डॉ. रवी पाटील सकाळी एपीएमसी येथील भाजी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर बिम्समधील संचालक व अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बेळगाव उत्तरमध्ये रोड शो होणार असून त्यामध्ये डॉ. रवी पाटील सहभागी होणार आहेत.