बेळगाव : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बेरियट्रिक सर्जन डॉ. सुरेंद्र उगाळे व डॉ. आयुष्का दीक्षित-उगाळे मंगळवार दि. 14 फेब्रुवारी रोजी बेळगाव येथील नामांकित अरिहंत हॉस्पिटलमध्ये येणार आहेत. आज वजन वाढल्याने व लठ्ठपणामुळे अनेक लोक त्रस्त झाले असून वजनवाढीमुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळत आहे. तसेच अवेळी आहाराचे सेवन, योग्य झोप नसणे, व्यसन आदींमुळे लठ्ठपणा व मधुमेहासारखे ऊग्ण वाढत आहेत. अशा रुग्णांना डॉ. उगाळे यांचा सल्ला उपयुक्त ठरणार आहे.
डॉ. सुरेंद्र उगाळे हे अलूरियन प्रक्रियेद्वारे लठ्ठपणा व वजन कमी करण्यात अग्रणी असून ते शस्त्रक्रियेद्वारेदेखील वजन कमी करण्यात प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर डॉ. सुरेंद्र उगाळे चयापचय व प्रगत लॅप्रोस्कॉपिक शस्त्रक्रियांमध्येही नावाजलेले आहेत. त्यांनी जर्मनी, ब्राझील, अमेरिका येथे प्रशिक्षण घेऊन वजन कमी करणे व लॅप्रोस्कॉपिक शस्त्रक्रियांमध्ये अनेक डॉक्टरांना प्रशिक्षित केले आहे. डॉ. सुरेंद्र उगाळे यांनी आतापर्यंत 25 हजारहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. ते टाईप-2 मधुमेहासाठी लॅप्रोस्कोपिक इलियल इंटरपोझिशन प्रक्रिया सुरू करणारे दुसरे शल्यचिकित्सक असून अशाप्रकारची शस्त्रक्रिया करणारे दक्षिण भारतातील पहिले डॉक्टर आहेत. लठ्ठपणा, वजनवाढीमुळे त्रस्त ऊग्णांसाठी डॉ. सुरेंद्र उगाळे व डॉ. आयुष्का दीक्षित-उगाळे यांचा सल्ला व उपचार मिळणार आहेत. अलीकडेच सुरू झालेले अरिहंत हॉस्पिटल नावारुपास येत आहे. रुग्णांच्या तक्रारी लक्षात घेऊन येथे अनेक नामवंत डॉक्टर येत आहेत. डॉ. उगाळे स्थूलत्व निवारण करण्यात तज्ञ आहेत. स्थूलत्व, वजनवाढ व मधुमेहग्रस्त असलेल्या ऊग्णांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 0831-2441199 किंवा 9036102390 क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.