प्रतिनिधी /म्हापसा
लायन्स क्लब ऑफ म्हापसा यांचा 2022-23 चा 58 वा अधिकारग्रहण सोहळा नुकताच बोडगेश्वर सभागृहात नुकताच पार पडला. ज्यामध्ये नवीन अध्यक्ष म्हणून परमानंद आमोणकर यांनी पदभार स्वीकारला. यावेळी प्रसिद्ध उद्योजक आणि साहित्यिक एमजेएफ लायन डॉ. गुरुदास नाटेकर यांचा त्यांनी उद्योग, साहित्य, शिक्षण, सामाजिक, क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल प्रमुख पाहुणे डॉ. विवेक नाईक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर गोकुळदास नागवेकर, उदय नास्नोडकर, मनोज चिंदरकर उपस्थित होते.