प्रतिनिधी /पणजी
सुप्रसिध्द कोकणी साहित्यका आणि लोकवेद संशोधिका डॉ. जयंती नायक यांनी ‘ गोवा की लोककथाएं ‘ हे कोंकणी लोककथांवर लिहिलेले हिन्दी भाषेतील पुस्तक हल्लीच प्रकाशित झालेले आहे. इन्स्टीटय़ूट मिनेझिस ब्रागांझा ,पणजी या संस्थेच्या सहयोगाने वजरी-पेडणे येथे ता. 28 मे रोजी बहुभाषिक लेखक मेळाव्यात त्याचे लोकार्पण झालेले आहे. दिल्लीच्या सुप्रसिद्ध प्रभात प्रकाशन या संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. भारतांतील 27 राज्यांतल्या लोककथांचे संग्रह प्रकाशित करण्याच्या तांच्या लोककथांच्या शृंखलेत हे पुस्तक प्रसिध्द झालेले आहे. ह्या पुस्तकाच्या निमित्याने कोंकणी लोककथा भारतीय स्थराचेर वाचक आ?ाr अभ्यासकां पर्यंत पोहोचलेली आहे.
हे पुस्तक म्हणजे कोंकणी लोककथाचा एक प्रातिनिधीक संग्रह आहे. यांत कोंकणी लोककथेचे नितीकथा, शौर्यकथा, हास्यकथा, मालाकथा, प्राणीकथा, राजा-राणीच्या कथा, चातुर्यकथा असे विविध प्रकार समावि÷ केलेले आहेत. शिवाय कोंकणी लोककथेच्या स्वरुप आणि स्वभावाची ओळख घडविणारी लेखिकेची अभ्यासपुर्ण अशी प्रदीर्घ प्रस्तावना या पुस्तकात आहे. कोंकणी लोककथेचे अध्ययन करणाऱया हिन्दी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणाऱया या पुस्तकाचे मुल्य रु. 225/- आहे. गोव्यात हे पुस्तक लेखका डॉ. जयंती नायक, घर नं. 84, आमोणें, केपें, गोंय 403705 , संपर्क -9823575623 यंच्याकडे उपलब्ध आहे , तसेंच तें अमेझोनाचेरूय आहे.
डॉ. जयंती नायक ही कोंकणीतील बहुचर्चित अशी लेखिका आहे. तिचीं विविध विषयावरील सुमारे 50 पुस्तके आतापर्यंत प्रसिद्ध झालेली आहेत. ती कित्येक प्रति÷sच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेली आहे. तिने लिहिलेले लोकवेद विषयावरील ‘गूढबंध’ नावाचें मराठी भाषेतील पुस्तक हल्लीच प्रकाशित झालेले आहे. शिवाय इंग्रजी आणि कन्नड भाषेतही तिच्या कथांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.