प्रतिनिधी/ सातारा
वृक्ष संवर्धनाचे कार्य करणारे व वृक्ष संवर्धनाची चळवळ वाढवणारे सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीपकुमार इंगवले यांना पांडूरंग चौगुले स्मती गौरव पुरस्काराने केशव सृष्टीच्या माजी अध्यक्षा डॉ. अलका मांडके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह होते. दरम्यान, यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर म्हणाले, पांडूरंग चौगुले यांचे कार्य या पुरस्काराच्या रुपाने चिरतंन ठेवण्याचे काम केले जात आहे.
हॉटेल सुरुबन येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळय़ावेळी ते बोलत होते. यावेळी पुरुषोत्तम शेठ, डॉ. सोमनाथ साबळे, संध्या चौगुले, डॉ. सुनील यादव, ज्येष्ठ पत्रकार हरीश पाटणे, शिराष चिटणीस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर म्हणाले, हा कार्यक्रम आनंददायी पारिवारिक असा आहे. डॉ.सोमनाथ साबळे यांच्याकडे अपॉईंटमेंट घेण्यासाठी आमच्याकडे फोन येतात. असे डॉक्टर या आणि भुलतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या अलका मांडके हे या पुरस्कारासाठी आल्या. त्यामुळे या पुरस्काराची उंची वाढली आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्राr असते असे म्हटले जाते. परंतु यशस्वी स्त्राrच्या मागेही पुरुष असतो हे मी संध्याच्या बाबतीत अनुभवले आहे. पांडुरंग चौंगुले हे माझे चांगले मित्र होते. ते माझ्याशी मनमोकळेपणाने बेलायचे. ते संध्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले होते. संध्याने आपल्या कामातून वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्याला आता ज्या ललिता, ममता या महिला माहिती आहेत. त्यांच्या जोडीचे कार्य संध्या यांचे आहे. पुरस्कार देवून संध्या हिने पांडूरंग चौगुले यांच्या कार्याचे स्मरण सुरु ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ.अलका मांडके म्हणाल्या, संध्याची आणि माझी पहिली ओळख ती लेख माझ्याकडे घेवून आली तेव्हा झाली. तोच लेख पुरस्कारासाठी महत्वाचा होता. परंतु त्या पुरस्काराचे बाजूला राहून गेले आणि संध्या आणि मी मी कधी मैत्रिणी बनलो, कधी एकमेकींच्या बहिणी झालो हे समजलेच नाही. संध्या मुंबईला यायची. तिच्या कामात गढून जायची. वृक्ष चळवळीमध्ये ती रमायची. मी सामाजिक कार्य करताना कधीही भेदभाव केला नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी हरीष पाटणे यांच्यासह अनेकांनी आपली मते व्यक्त केली.