प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावच्या केएलई हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र नेर्ली यांना ‘प्रेरणादायी युरॉलॉजिस्ट’ या सन्मानाने नवी दिल्ली येथे डॉ. किरण बेदी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ईकॉनॉमिक टाईम्स एज या संस्थेतर्फे 30 जून रोजी नवी दिल्ली येथे वाणिज्य मंत्री पियुष गोयल, बिहारचे आरोग्यमंत्री डॉ. मंगल पांडे, डॉ. तमिलसाई सौंदर राजन, माजी राज्यपाल डॉ. किरण बेदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
भारतातून एकूण 200 डॉक्टरांची निवड करण्यात आली. इकॉनॉमिक टाईम्सने उद्योजक आणि वैद्यकीय तज्ञ यांच्याशी संवाद साधून केलेल्या सर्वेक्षणानंतर या डॉक्टरांची निवड करण्यात आली. यामध्ये डॉ. नेर्ली यांचा समावेश आहे.