क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
डॉ. रामाणी गोवा मॅराथोन 6 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. 21 कि. मी., 10 कि. मी. व 5 कि. मी. अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात येईल. बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सकाळी 6 वा. स्पर्धेला प्रारंभ होणार असून स्पर्धकांनी सकाळी 5.30 वा. उपस्थित राहावे.
विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येईल. याशिवाय 39 वर्षाखालील व 40 वर्षावरील वयोगटातील पुरुष व महिलांसाठी पारितोषिके देण्यात येणार आहे. ऑनलाईन नावनोंदणीसाठी https://drramanigoamarathon.com/information/ यावर भेट द्यावी. ऑफलाईन नावनोंदणी नायल स्पोर्ट्स व लीना स्पोर्ट्स फोंडा किंवा रजत हळदणकर द्वारा मिनीनो हॉटेल फोंडा (सकाळी 10.30 ते दु. 1 पर्यंत) यांच्याकडे करावी. 10 किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या धावपटूंच्या गटाला सवलत देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 8390980280 यावर संपर्क साधावा.