Tarun Bharat

Kolhapur : डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त पक्षी निरिक्षण मोहिम

कोल्हापूर प्रतिनिधी

ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. सलीम अली यांची जयंती आणि ज्येष्ठ वनसंरक्षक, अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभर साजरा होणार्या पक्षी सप्ताहांतर्गत रविवारी वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन आणि बर्ड्स ऑफ कोल्हापूर संस्थेतर्फे रंकाळा तलाव परिसरात पक्षी निरीक्षण मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्लिथचा, वेळू, वटवटय़ा, पिवळा धोबी, करडा धोबी, साधी तुतारी, साधा हिरवा टिलवा हे स्थलांतरित पक्षी तसेच शिक्रा, मोहोळ घार हे शिकारी पक्षी अशा 35 हून अधिक प्रजातींच्या पक्षांची नोंद करण्यात आली.

मोहिमेमध्ये महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर आणि पक्षी तज्ञ आशिष कांबळे यांनी मार्गदर्शन केले. येणार्या काळामध्ये रंकाळा संवर्धन आणि येथील जैवविविधता टिकवण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक नागरिकांच्या लोकसहभागातून विविध कार्यक्रम घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सृजन आनंद विद्यालय आणि आनंदी बाल भवन शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील पक्षी निरीक्षणाचा मनमुराद आनंद लुटला.

या मोहिमेमध्ये वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्डे, बर्ड्स ऑफ कोल्हापूर संस्थेचे प्रणव देसाई, पृथ्वीराज सरनोबत, ऋतुजा पाटील, ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे सतपाल गंगलमाले, सतीश कोरडे, परितोष उरकुडे, विद्या पाथरे, सविता साळोखे, धनश्री भगत, अमर पोवार, अक्षय कांबळे, साजिद शेख, विशाल पाटील, सचिन पोवार, शिवम जाधव यांच्यासह पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी सहभागी झाले होते.

Related Stories

भोगावती कारखाना ते गैबी तिट्टा रस्त्यांसाठी 36 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर : आमदार आबिटकर Rs

Abhijeet Khandekar

छत्रपती शिवाजी आणि राजर्षी शाहू महाराजांना अमित शहांनी केले अभिवादन

Archana Banage

कोल्हापूर शहरात 47 कंटेन्मेंट झोन,105 सक्रीय रूग्ण

Archana Banage

राज्यांना स्वतंत्र क्रीडा मंत्रालय आवश्यक – श्रीनिवास रेड्डी

Archana Banage

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कळंबा, मोरेवाडी,पाचगाव ग्रामपंचायतींना नोटीस

Archana Banage

शरद इन्स्टिट्यूटवर ४ हजार जागांसाठी रोजगार मेळावा-राजेंद्र पाटील-यड्रावकर

Archana Banage