Dr. Shripad Patil, Vinayak Patil honored as Health Ambassadors
सिंधुदुर्ग जिल्हा रूग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील तसेच १०८ रुग्णवाहिका विभागाचे जिल्हा व्यवस्थापक विनायक पाटील यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता केलेले महान कार्य सर्वांच्या लक्षात राहणारे असून सध्या मनुष्यबळ, यंत्रणांचा अभाव असतानाही त्यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी व कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत असल्यामुळेच जिल्ह्यात रूग्णांचे जीव वाचत आहेत. असे प्रतिपादन सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटना तथा देव्या सुर्याजी गृपचे दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी यांनी केले.
आरोग्य क्षेत्रात गोरगरीब रुग्णांना अहोरात्र सेवा देणाऱ्या तसेच कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम केलेल्या आरोग्य दुतांचा सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी व देव्या सुर्याजी गृपच्यावतीने सिंधुदुर्गचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.एस. पाटील यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी देव्या सुर्याजी बोलत होते. यावेळी संघटनेचे राघवेंद्र चितारी, अर्चित पोकळे, संदीप निवळे, साईश निर्गुण, वसंत सावंत, दिग्विजय मुरगूड, सिद्धेश मांजरेकर, पांडुरंग वर्दम, प्रथमेश प्रभू, देवेश पडते, मेहर पडते, अनिकेत पाटणकर, गौतम माठेकर यांच्यासह युवा रक्तदाता संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
डॉ. श्रीपाद पाटील आणि त्यांचे सहकारी व कर्मचारी जिल्हा रूग्णालयाच्या माध्यमातून निःशुल्क आरोग्य सेवा देत गोरगरीब, गरजूंसाठी देवदूत ठरले. तर १०८ रुग्णवाहिकेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मॅनेजर विनायक पाटील आणि त्यांचे सहकारी व कर्मचारी गेल्या ८ वर्षापासून जिल्हयात निःशुल्क अखंडित सेवा देत रुग्णांचे जीव वाचवतात. त्यामुळे ही सेवा जिल्हावासीयांची लाईफलाईन ठरली आहे. त्यामुळे या दोन्ही आरोग्य सेवेतील विभागाची दखल घेऊन त्यांचा प्रातिनिधिक सन्मान युवा रक्तदाता संघटना व देव्या सुर्याजी गृपच्यावतीने करण्यात आला.
ओटवणे / प्रतिनिधी