Tarun Bharat

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना काणकोण भाजपतर्फे आदरांजली

प्रतिनिधी /काणकोण

काणकोण भाजप मंडळाने नुकतीच भाजपाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. सभापती रमेश तवडकर यांच्या कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला तवडकर, काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, काणकोणचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो, नगरसेवक रमाकांत ना. गावकर, अन्य नगरसेवक त्याचप्रमाणे काणकोण भाजप मंडळाचे अन्य पदाधिकारी, महिला मोर्चाच्या चंदा देसाई तसेच महेश नाईक उपस्थित होते. डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केल्यानंतर सभापती तवडकर यांनी आपल्या भाषणात त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. संघटन आणि सेवा ही मूळ तत्त्वे सांभाळून डॉ. मुखर्जी यांनी या पक्षाला बळकटी दिली, अशा शब्दांत सभापतींनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. विशाल देसाई यांनी स्वागत केले, तर विशांत गावकर यांनी आभार मानले.

Related Stories

अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी हरमल येथे दोघांना अटक

Patil_p

वास्को शहरातील 59 बेवारस वाहने हटवली

Patil_p

वाळपई-सोनाळ रस्त्यावरील दरड एकाच दिवसांत हटविली

Amit Kulkarni

ऑनलाईन पद्धतीमुळे सरकारमान्य स्वस्त धान्य पुरवठा योजना अडचणीत

Patil_p

भाजप पुरस्कृत उमेदवाराना निवडून द्या

Amit Kulkarni

जोपर्यंत ग्रामसभा नाही, तोपर्यंत मोले प्रकल्पांना मान्यता नको

Patil_p